सर्तकतेचा इशारा

 


  अकोला,दि.22(जिमाका)- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार मंगळवार (दि. 27 जुलै) पर्यंतच्या कालावधीत  जिल्ह्यामध्ये हल्का ते मध्यम अधिक स्वरुपाचे पर्जन्यमान तसेच विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

दगडपारवा प्रकल्प पूर निपयंत्रण  कक्षाच्या माहितीनुसार गुरुवार दि.22 रोजी सकाळी 11 वाजता दगडपारवा प्रकल्पाचे एक वक्रव्दारे प्रत्येकी 2.50 सेमी उंचीने उघडली असून नदीपात्रात एकूण 2.05 घ.मी./से. एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. पुर्णा बॅरेज-2(नेरधामणा) बॅरेकची सर्व व्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहे. पूर पातळी 243.50 मी.असून 12 गेट मधुन पूराचे पाणी वाहत आहे. पूर विसर्ग 4672.92 घमीप्रसे आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत निर्णय घेण्यात येईल. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेवून  सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरु असताना व पूर परिस्थिती असताना पूर पाहण्यास गर्दी करुन नये. पुलावरुन पाणी  वाहत असतांना दुचाकीने किवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आपले मुख्यालयी उपस्थितीत राहुन सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा आरोरा यांनी दिले आहेत.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ