६०२ अहवाल प्राप्त, सात पॉझिटीव्ह, १५ डिस्चार्ज, एक मृत्यू

  अकोला,दि.6(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ६०२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५९५ अहवाल निगेटीव्ह तर सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान १५   जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.५) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57648(43102+14369+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर सात+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी चार = एकूण पॉझिटीव्ह-११

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २९५७५५ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे २९२२५० फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१०८ नमुने होते. आजपर्यंत एकूण २९५७१४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २५२६१२ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

सात पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे.

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-अकोट- दोन, मुर्तिजापूर- एक, अकोला-चार (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-तीन). दरम्यान काल (दि.५) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांत चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

एक मृत्यू

दरम्यान आज एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. ही रुग्ण यशवंत नगर, अकोला येथील ५० वर्षीय महिला असून या महिलेस दि. ४ जुलै रोजी दाखल केले होते,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

१५ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार, आयकॉन हॉस्पिटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील १० असे एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

२२६ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57648(43102+14369+177)आहे. त्यात ११३० मृत झाले आहेत. तर ५६२९२जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २२६ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना