३९३ अहवाल प्राप्त, ‘शून्य’ पॉझिटीव्ह, सहा डिस्चार्ज; रॅपिड चाचण्यात एक पॉझिटीव्ह

 अकोला,दि.३०(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ३९३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३९३ अहवाल निगेटीव्ह तर कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.२९) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७७६०(४३१७६+१४४०७+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शून्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह एक.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३०४५८१ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३०१०३७  फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१४७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३०४५३९ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २६१३६३ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

‘शून्य’ पॉझिटिव्ह

आज आरटीपीसीआर चाचण्यांचा दिवसभरात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. दरम्यान काल (दि.२९) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, त्याची नोंद एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी.

सहा जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज सायंकाळपर्यंत बिहाडे हॉस्पिटल मधुन एक तर होम आयसोलेशन मधील पाच असे सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

४९ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७७६०(४३१७६+१४४०७+१७७) आहे. त्यात ११३४ मृत झाले आहेत. तर ५६५७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ५४ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ