बकरी ईद साजरी करतांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

 अकोला, दि.१६(जिमाका)-‘बकरी ईद  हा सण दि.२१ रोजी (चंद्र दर्शनावर अवलंबून) साजरा होणारअसुन तो अत्‍यंत साधेपणाने साजरी करणे आवश्‍यक असल्‍याचे मार्गदर्शक सुचना प्राप्‍त झाल्‍या आहेत. तेव्हा जिल्ह्यात बकरी ईद साजरी करतांना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे,असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी  निर्देश दिले आहेत.

            यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की, जिल्‍ह्यात कोविड-१९ च्‍या संसर्गजन्‍य परिस्‍थीतीचा विचार करता मागील वर्षापासून विवीध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्‍सव, सण अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरे करण्‍यात आले आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी धोका द्यापही कायम आहे. त्‍यादृष्‍टीने सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येवुन उत्‍सव साजरा करणे उचित होणार नाही.  तसेच कोविड-१९ च्‍या डेल्‍टा व्‍हेरिएंट च्‍या प्रार्दुभावामुळे संभाव्‍य परिस्थिती लक्षात घेता संपुर्ण राज्‍यामध्‍ये Level-3 नुसार निर्बंध जारी केले आहेत. यासंदर्भात महाराष्‍ट्र शासनाने निर्गमित केलेल्‍या खालील मार्गदर्शक सुचनाचे काटेकोर पालन करणे आवश्‍यक आहे.

१.         संपुर्ण अकोला जिल्‍ह्यात सकाळी सात ते सायंकाळी चार या कालावधीत अत्‍यावश्‍यक तसेच बिगर      अत्‍यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्‍यात आले आहेत.

२.         प्रत्‍येक शनिवार व रविवार या दिवसी अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर प्रतिष्‍ठाने बंद ठेवण्‍यात आली आहेत.

३.         सायंकाळी पाच वाजेपासून दुस-या दिवशी सकाळी पाच  वाजेपर्यंत संचारबंदी तसेच सकाळी सात        वाजेपासुन सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागु करण्‍यात आली असुन सायंकाळी पाच वाजेनंतर        कोणत्‍याही व्‍यक्‍तीस मुक्‍त संचार करण्‍यास मनाई आहे.

४.        आगामी कालावधीमध्‍ये साजरे होणारे सण व उत्‍सव लक्षात घेता कायदा व सुव्‍यवस्‍थेच्‍या दृष्टिकोनातुन            कलम ३७ ()() लागु करण्‍यात आले आहे.

५.         कोविड-१९ मुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीमुळे राज्‍यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्‍यामुळे     बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्‍या घरीच अदा करावी.

६.         सध्‍या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्‍यास त्‍यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दुरध्‍वनीवरून जनावरे खरेदी करावी.

७.        नागरिकांनी शक्‍यतो प्रतिकात्‍मक कुर्बानी करावी.

८.         लागु करण्‍यात आलेले Level of Restriction for Breaking the Chain, Dated ०४/०६/२०२१ आणि त्‍यानंतर             वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या सुचनांनूसार इतर निर्बंध कायम राहतील.त्‍यामध्‍ये बकरी ईद निमित्‍त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

९.         बकरी ईदच्‍या निमित्‍ताने नागरिकांनी कुठल्‍याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये.

१०.       कोविड या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण    विभाग तसेच संबधित महापलिका, पोलीस, स्‍थानिक प्रशासन व या कार्यालयाने कोरोना संदर्भांने निर्गमित केलेल्‍या विविध आदेशांचे उल्‍लघंन होणार नाही याची दक्षता घेवुन व विहीत केलेल्‍या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.तसेच यानंतर व प्रत्‍यक्ष सण सुरू होण्‍याच्‍या मध्‍यल्‍या कालावधीत काही सुचना जारी झाल्‍यास त्‍याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील,असे  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आपल्या निर्देशात म्हटले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ