४२० अहवाल प्राप्त, तीन पॉझिटीव्ह, सहा डिस्चार्ज

 अकोला,दि.२८(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ४२० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४१७ अहवाल निगेटीव्हतर तीन  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  दरम्यान सहा जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.२७) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७७५८(४३१७६+१४४०५+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर तीन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य = एकूण पॉझिटीव्ह तीन.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३०३८९८ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३००३५६  फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१४५ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३०३८३६ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २६०६६० आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

तीन पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन पुरुषांचा समावेश असून त्यातील एक पातूर येथील, एक हातरुण ता.बाळापूर तर अन्य एक शास्त्री नगर अकोला येथील रहिवासी आहे. दरम्यान काल (दि.२७) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची नोंद घ्यावी.

सहा जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर बिहाडे हॉस्पिटल येथून एक तर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच असे एकूण सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

५३ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७७५८(४३१७६+१४४०५+१७७) आहे. त्यात ११३४ मृत झाले आहेत. तर ५६५७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ५३ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ