विभागीय आयुक्तांनी घेतला मदत, पुनर्वसन कार्याचा आढावा

 




अकोला,दि.३०(जिमाका)-जिल्ह्यात झालेल्या  अतिवृष्टीमुळे झ्गालेल्या नुकसानीनंतर जिल्ह्यात सुरु असलेल्या मदत पुनर्वसन  कार्याचा आढावा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे वाकोडे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त सिंह यांनी जिल्ह्यात झालेले शेतीचे नुकसान, विमाधारक शेतकऱ्यांची संख्या, त्यांचे झालेल्या पंचनाम्याचे प्रमाण,  पिक निहाय झालेले नुकसान, घरांची पडझड,  जिल्ह्यात सुरु झालेले सानुग्रह अनुदान वितरण याबाबत यंत्रणेकडून माहिती घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ