८५४ अहवाल प्राप्त, पाच पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज, एक मृत्यू

  अकोला,दि.१४ (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ८५४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ८४९  अहवाल निगेटीव्ह तर पाच अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.१३) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57708(43131+14400+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर पाच + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी सहा = एकूण पॉझिटीव्ह ११.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २९९४३६ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे २९५९१० फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१२९ नमुने होते. आजपर्यंत एकूण २९९३०५ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २५६१७४ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

पाच पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  पाच अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिला व  तीन पुरुषाचा समावेश आहे.

त्यात तालुकानिहाय पुढील प्रमाणे- पातूर-एक, अकोला- चार (अकोला ग्रामीण-एक व अकोला मनपा क्षेत्र-तीन), अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

आज दिवसभरात एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बोरवाकली, अकोला येथील ३२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१३  जुलै रोजी दाखल केले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

दोन  जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर दरम्यान आज दुपारनंतर ओझोन येथील एक, अवघाते हॉस्पिटल येथील एक, असे एकूण दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

53 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57708(43131+14400+177) आहे. त्यात  1132 मृत झाले आहेत. तर 56523 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 53 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ