412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह


अकोला,दि.31(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 412 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 408 अहवाल निगेटीव्ह तर चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.30) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57764(43180+14407+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर चार + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह चार.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 304963 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 301419  फेरतपासणीचे 397 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3147 नमुने होते. आजपर्यंत एकूण 304951 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 261771आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 चार पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-  पातूर-दोन, बार्शीटाकळी-एक, अकोला मनपा क्षेत्र- एक. दरम्यान काल (दि.30) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, त्याची नोंद एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी.

53 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57764(43180+14407+177) आहे. त्यात 1134 मृत झाले आहेत. तर 56577 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 53 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

                                                           ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ