राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले

                 अकोला, दि. २८ (जिमाका)- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य/गळीतधान्य/नगदी पिके सन २०२१-२२ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये कडधान्य, गळीतधान्य व तृणधान्य या पिकांचे अनुदानीत दराने बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषि औजारे व सिंचन साधने या बाबींचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे.

राज्यात  सन २०१४-१५ पासुन सुधारीत मार्गदर्शक सुचने नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. सन २०१८-१९ पासून या अभियानात पौष्टिक तृणधान्य व गळीतधान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानासाठी निधीची तरतूद केंद्र व राज्य ६० ते ४०  टक्के प्रमाणे आहे.

योजनेचा उद्देश : क्षेत्र विस्तार उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात शाश्वत वाढ करणे.जमिनीची सुपीकता उत्पादन क्षमता वाढ विणे.शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरउंचावणे. अपरंपारिक भातपड क्षेत्रावर कडधान्य/ गळीतधान्य पिकाच्या क्षेत्र वृद्धी व उत्पादकतेत वाढ करणे, हा आहे.

अभियानामध्ये राबविण्यात येणाऱ्या बाबी   :

पीक प्रात्यक्षिके - पीक प्रात्यक्षिके, पीक पद्धतीवर आधारीत प्रात्यक्षिके (आंतरपिक) इ., मुलभूत बियाणे खरेदी (गळीतधान्य), प्रमाणित बियाणे वितरण व बियाणे उत्पादनास अर्थसहाय्य, एकात्मिक कीड व अन्नद्रव्ये व्यवस्थापन, सुधारित कृषि औजारे व सिंचन साधन, पीक पध्दतीवर आधारीत प्रशिक्षण.

वैशिष्ट्यपूर्ण बाबी-शेतकऱ्यांचे शेतमालाचे मुल्यवर्धनासाठी मिनी दाल मिल (शेतकरी गटासाठी),बीज प्रक्रिया संच (FPO साठी) तेलघाणीइ. घटकांची स्थानिक पुढाकाराच्या बाबींतर्गत अंमलबजावणी केली जाते.

·         राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य/गळीतधान्य/नगदी पिके सन २०२१-२२ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये कडधान्य, गळीतधान्य व तृणधान्य या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके,सुधारित कृषि औजारे व सिंचन साधने या बाबींचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावेत.

·         महा-डीबीटी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांमधून मंजूर कार्यक्रमाच्या मर्यादेत लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

·         राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांसाठी कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट ला भेट द्यावी.

·         अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी/ मंडळ कृषि अधिकारी/ कृषि पर्यवेक्षक/ कृषि सहाय्यक/  यांचेशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के. बी. खोत यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा