१३५ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज

 अकोला,दि.१२(जिमाका)-  जिल्ह्यात गेल्या दोन दिवस झालेल्या पावसामुळे मुर्तिजापुर व अकोट या दोन तालुक्यात १३५ हेक्टर क्षेत्रावर  पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाआहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालात नमुद केल्यानुसार,  मुर्तिजापूर तालुक्यात १५ गावांतील २५ हेक्टर तर अकोट तालुक्यातील २२ गावांत ११० हेक्टरवर  असे एकूण १३५ हेक्टर क्षेत्रावर  पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच अकोट तालुक्यात  एक घर अंशतः तर मुर्तिजापूर तालुक्यात सहा घरे अंशतः तर बाळापूर तालुक्यात  एक घर पूर्णतः कोसळून नुकसान झाले आहे. जिल्ह्यात कासारखेड ता. बाळापूर येथे सतरंजीपूरा भागात दि.१० रोजी  घर कोसळून  शेख कामराम शेख रसूल  (वय ९ वर्षे) याचा मृत्यू झाला. तसेच  बटवाडी खु ता. बाळापुर येथे भगवंत पुंजाजी राऊत यांच्या मालकीचा बैल वीक कोसळून ठार झाला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ