129 अहवाल प्राप्त, एक पॉझिटीव्ह, चार डिस्चार्ज


 अकोला,दि.19(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 129 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 128 अहवाल निगेटीव्ह तर एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यान चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.18) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57721(43142+14402+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह दोन.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 301223 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 297686 फेरतपासणीचे 397 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3140 नमुने होते. आजपर्यंत एकूण 301176 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 258034 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

एक पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका महिलेचा समावेश असून  त्या अकोला मनपा क्षेत्रातील आहे, दरम्यान काल (दि.18) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांत एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

चार जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, आधार हॉस्पीटल येथील एक, असे एकूण चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

43 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57721(43142+14402+177) आहे. त्यात  1133 मृत झाले आहेत. तर 56545 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 43 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

            ००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा