आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र; बोधचिन्ह (LOGO) स्पर्धेचे आयोजन

           अकोला,दि.२९(जिमाका)- क्रीडा क्षेत्रातील कामगिरी उंचावणे व दर्जेदार खेळाडू, क्रीडा संधी निर्माण करणे या उद्देशाने शासनाने राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र स्थापन केले आहे. या क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह  ठरविण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घे, नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन, खेळाडुंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे हा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापीठ निर्मितीचा उद्देश आहे.

            या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (LOGO) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेच्या नियम,अटी पुरस्कार विषयक माहिती क्रीडा युवक सेवा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या स्पर्धेत भारतातील कोणीही नागरिक भाग घेऊ शकता, तसेच या स्पर्धेसाठी आपले बोधचिन्ह (LOGO) तयार करुन सादर करण्याचा  अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०२१ असा राहील.

या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय तृतीय क्रमाकांच्या विजेत्यांना ५० हजार रुपये, ३० हजार  रुपये व २० हजार रुपये पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. तरी अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे तसेच महाविद्यालयीन युवक युवतींनीही सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ