पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दि.८ ऑगस्ट ऐवजी दि.९ ऑगस्ट रोजी

 अकोला, दि. २८ (जिमाका)- महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8 वी) ही दि.23 मे 2021 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती. मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा रविवार दि. 8 ऑगस्ट रोजी घेण्यास मान्यता देण्यात आली होती. परंतु दि. 8 ऑगस्ट रोजी काही जिल्ह्यात केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तती परिक्षा (इ.8 वी) दि. 8 ऑगस्ट ऐवजी  सोमवार दि. 9 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र दि. 27 जुलै पासून संबंधीत शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत, या बदलाची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आयुक्त तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांनी कळविले आहे. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ