३१० अहवाल प्राप्त, दोन पॉझिटीव्ह, ६८ डिस्चार्ज
अकोला,दि.7(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ३१० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३०८ अहवाल निगेटीव्ह तर दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान ६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.६) रॅपिड ॲटीजेन
टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 57654(43104+14373+177)
झाली आहे, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण
पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी चार = एकूण पॉझिटीव्ह-सहा.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २९६०८१ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे २९२५६७
फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३११७ नमुने होते. आजपर्यंत एकूण २९६०२४
अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २५२९२० आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
दोन पॉझिटिव्ह
आज दिवसभरात दोन जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापूर-
एक, बाळापूर-एक. दरम्यान काल (दि.५) रॅपिड
ॲन्टीजेन चाचण्यांत चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्यांचाही
समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
६८ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक, उपजिल्हा रुग्णालय
मूर्तिजापूर येथील चार, अकोला अक्सीडेंट येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ६२ असे एकूण ६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात
आली.
१६४ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात
एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57654(43104+14373+177)आहे. त्यात ११३० मृत झाले आहेत. तर ५६३६० जणांना डिस्चार्ज
देण्यात आला असून सद्यस्थितीत १६४ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा