कृषि मंत्री ना. दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा

 



अकोला,दि.24 (जिमाका)- राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे हे रविवार   दि. 25 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

रविवार दि. 25 रोजी दुपारी 1 वा. 45 मि.नी दर्यापूर जि. अमरावती येथुन म्हैसांगकडे रवाना, दुपारी 2 वा. 5 मि.नी म्हैसांग येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी. दुपारी 2 वा. 25 मि. नी रामगाव जि.अकोला येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी. दुपारी 2 वा.50 मि.नी दापुरा जि.अकोला येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी. दुपारी सव्वातीन वाजता अंबिकापूर येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी. दुपारी 3 वा. 40 मि.नी आपातापा जि.अकोला येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी. दुपारी 4 वा. 05 मि. नी घुसर येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी. दुपारी साडेचार वाजता उगवा येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी. दुपारी 4 वा. 50 मि.नी सुकोडा जि.अकोला येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी.

दुपारी सव्वापाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आगमन व महसूल, कृषी, ग्रामविकास विभाग, जिल्हास्तरीय अधिकारी समवेत बैठक. सायंकाळी सव्वासहा ते साडेआठ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. रात्री साडेआठ वाजता शासकीय विश्रामगृह, अकोला येथून रेल्वे स्टेशनकडे रवाना व रात्री नऊ वाजता मुंबई एक्सप्रेसने नाशिककडे प्रयाण.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ