गर्भवती महिलांनी लस घ्यावी- डॉ. राजकुमार चव्हाण

            अकोला,दि.21 (जिमाका)- कोरोना विषाणुचा प्रतिबंध करण्यासाठी त्रिसुत्रीय नियमासह कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अत्यावश्यक आहे. आज जिल्हा स्त्री रुगणालय येथे गर्भवती महिला व स्त्रियांसाठी कोविड लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. गर्भवती महिलांना कोरोना विषाणुपासून रक्षण करण्यासाठी लसीकरण अत्यंत प्रभावीशाली माध्यम असून जास्तीत जास्त गर्भवती महिलांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा,असे आवाहन आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले.

            गर्भवती महिला व सर्व स्त्रियांसाठी कोव्हॅक्सीन लसीकरणाचे आयोजन जिल्हा स्त्री रुग्णालयात करण्यात आले होते. यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसू, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, डॉ. अनुप चौधरी आदि उपस्थित होते.

गर्भवती मातांसाठी लसीकरण मोहिमेअंतर्गत 41 गर्भवती महिला व दोन स्त्रिया असे एकूण 43 महिलांना कोव्हॅक्सीनचा पहिला डोस देण्यात आला. गर्भवती महिला व सर्व स्त्रियांकरीता लसीकरण मोहिम उपलब्धतेनुसार अविरत चालु राहणार आहे. लसीकरणाकरीता  माता बाल संगोपन कार्ड व आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. तरी सर्व महिलांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा,असे आवाहन स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल यांनीही केले. 

000000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ