अतिवृष्टीग्रस्तांना सानुग्रह अनुदान; कोषागारातून ३ कोटी सहा लक्ष रुपयांचे देयक मंजूर

कोला,दि.२८(जिमाका)- जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना घरकुल नुकसान भरपाईसाठी सानुग्रह अनुदान वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्हा कोषागारात सादर केलेल्या ३ कोटी सहा लक्ष १० हजार रुपयांचे देयक मंजूर झाले आहे,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात सानुग्रह अनुदान वाटपासाठी १० हजार २०२ घरकुलांच्या नुकसानभरपाई पोटी ५ कोटी १० लक्ष १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देय आहे. त्यापैकी कोषागारात ६१२२ घरकुलांच्या नुकसानभरपाई साठी ३ कोटी सहा लक्ष १० हजार रुपयांचे देयक कोषागारात सादर करण्यात आले होते. उर्वरित देयकेही नंतर सादर होतील. हे देयक मंजूर होऊन निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार सानुग्रह अनुदान तहसिलदारांनी आपल्या स्तरावर तातडीने वितरीत करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ