टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी 'सेल्फि पॉईंट' : क्रीडा विभागाचा उपक्रम

 




अकोला,दि.१२(जिमाका)-  टोकियो येथे २३ जुलैपासून सुरु होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतातून  खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यात मह्राराष्ट्रातील दहा खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी क्रीडा विभागाने सेल्फि पॉईंट उभारले आहेत.

या सेल्फि पॉईंटवर आज स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सेल्फी घेऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी कर्यालयाच्या वतीने अकोला शहरात शास्त्री स्टेडियम, रेल्वेस्टेशन व जिल्हाधिकारी कार्यालय अशा तिन ठिकाणी सेल्फि पॉईंट उभारण्यात आले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ लावण्यात आलेल्या सेल्फि पॉईंटला जिल्हाधिकारी पापळकर यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी- कर्मचारी यांनी सेल्फि घेऊन शुभेच्छा दिल्या. कोणीही नागरीक, क्रीडा प्रेमी येथे येऊन सेल्फि घेऊन आपल्या शुभेच्छा देऊ शकतात,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ