प्रधानमंत्री पीक विमा योजना: १५ जुलै पर्यंत सहभागाचे आवाहन

 अकोला,दि.१२ (जिमाका)- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यंदाच्या खरीप हंगामात सहभागासाठी १५ जुलै पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे, तरी या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.कांताप्पा खोत यांनी  केले आहे.

अकोला जिल्ह्यासाठी खरीप हंगाम २०२१ साठी एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्श्युरन्स कं. लि. मुंबई या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.

या कंपनीचे  जिल्हा व तालुका प्रतिनिधी व त्यांचे संपर्क क्रमांक या प्रमाणे-

जिल्हा प्रतिनिधी- दिलीप सेन (८८२८००२४६०), शुभम हरणे(८०८७९०३१७१), अकोला तालुका- अभिषेक रानडे (८२३७४६१०४०), बार्शीटाकळी तालुका-नरेंद्र बहाकर(९७६६५५८५६१), मुर्तिजापूर तालुका- सचिन जायले(८९८३०३६६४०), अकोट तालुका- सुजय निपाने (७०५७५०२८७०), तेल्हारा तालुका- प्रफुल्ल मानकर (९६८९७६१५१२),  पातुर तालुका- धीरज कोहर(९५५२६२४९६६). बाळापूर तालुका-अमोल टाके (९७६६५८३२५६)

  तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस या अधिसूचित पिकांच्या विम्यासाठी संपर्क साधावा व शेतकऱ्यांनी १५ जुलै पूर्वी आपले अर्ज दाखल करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी,  तालुका कृषी अधिकारी,  कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ