पोटनिवडणूक कार्यक्रम स्थगितीमुळे मुर्तिजापूर तालुक्यातीलनियोजित प्रशिक्षणे रद्द

अकोला,दि.१५(जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार  जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक कार्यक्रम दि.९ रोजी रद्द केला आहे. त्यासंबंधित निवडणूक आचारसंहिताही संपूष्टात आली आहे. त्या अनुषंगाने मुर्तिजापूर तालुक्यातील मतदान मतमोजणी अधिकाऱ्यांची प्रशिक्षण सत्रे,  कर्तव्यावरील अधिकारी कर्मचारी यांच्या सभा  व पुर्वनियोजित मतदान केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचारी , मतमोजणी कर्मचारी यांची प्रशिक्षण सत्रे होणार नाहीत असे  मुर्तिजापूर येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते  यांनी कळविले आहे.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना