जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दि. ११ ऑगस्टला

 अकोला,दि.३०(जिमाका)- जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा २०२१ ही येत्या बुधवार दि.११ ऑगस्ट रोजी होणार आहे. यापुर्वी ही परीक्षा १६ मे रोजी होणार होती. मात्र ती त्यावेळी कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा  मुख्य कार्यालय पुणे यांच्या आदेशानुसार बुधावार दि.११ ऑगस्ट रोजी होणार आहे. याबाबत  अधिक माहिती ही www.navodaya.gov.in https://navodaya.gov.in/nvs/en/Contact-Us/NVS-Hqrs www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/AKOLA-en/home संकेतस्थळ व लिंक्सवर प्रकाशीत करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ७९०८८८३८३५/८०८०४१८६५९/९८२२२३६१२२/९९९९३५०४२५/९४२३२८२२६०/९९२२९४१३७१ येथे संपर्क करावा, असे आवाहन प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय  बाभुळगाव (जहा) जि. अकोला यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा