माळराजूरा येथे वनपर्यटनाचा आनंद घेण्याचे आवाहन

 अकोला, दि.३० (जिमाका)- अकोला वन विभागातील पातुर परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या माळराजूरा येथे वन पर्यटनाचा आनंद घ्यावा,असे आवाहन उपवन संरक्षक (प्रादेशिक) अर्जूना के.आर यांनी केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माळराजूरा येथील निसर्ग पर्यटन  अकोला तसेच इतर ठिकाणच्या नागरिकांना खुले करण्यात आले असून. नागरीक तसेच शाळकरी मुले / मुली माळराजूरा स्थळामध्ये असलेल्या विविध वन्यप्राणी हरीण, रोही, काळविट, मोर इत्यादी  प्राण्यांचा अधिवास आहे. तसेच याबाबत मनमुराद आनंद घेऊन त्यांना या परिसरात असलेल्या वन्यप्राणी, पक्षी यांचे जवळून निरिक्षण करण्याची व बघण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच तेथे असलेल्या नैसर्गिक झाडे, विविध वनस्पती तसेच सिंचन विभागामार्फत बांधण्यात आलेल्या पातुर तलावाचे नयनरम्य दृष्य पाहावयास मिळू शकते. नैसर्गिक पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) अर्जूना के.आर. यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ