११९ अहवाल प्राप्त, एक पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज

  अकोला,दि.१२ (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ११९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ११८ अहवाल निगेटीव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यान दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.११) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57689(43121+14391+177)झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य = एकूण पॉझिटीव्ह एक.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २९८००१ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे २९४४७८ फेरतपासणीचे ९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१२६ नमुने होते. आजपर्यंत एकूण २९७९४५ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २५४८२४ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

एक पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका महिलेचा समावेश असून ही महिला अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

दोन जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर हॉटेल इंद्रप्रस्थ येथील एक,  आयकॉन हॉस्पिटल येथील एक, असे एकूण दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

43 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57689(43121+14391+177) आहे. त्यात  1130 मृत झाले आहेत. तर 56516 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 43 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ