539 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह, नऊ डिस्चार्ज, एक मृत्यू


अकोला,दि.27(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 539 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 535 अहवाल निगेटीव्ह तर चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, दरम्यान नऊ जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.26) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा पॉझिटीव्ह अहवाल संख्या शून्य आली. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57755(43173+14405+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर चार + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह पाच.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 303478 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 299936  फेरतपासणीचे 397 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3145 नमुने होते. आजपर्यंत एकूण 303416 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 260243 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

चार पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिला व  दोन पुरुषांचा समावेश असून ते सर्व अकोला मनपा क्षेत्रातील आहे. दरम्यान काल (दि.26) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांत एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

एकाचा मृत्यू

आज दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद झाली.  हा रुग्ण आदर्श कॉलनी येथील 89 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 24 जुलै रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

नऊ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील एक व होम आयसोलेशन येथील  आठ जणांना असे एकूण नऊ जणांना  डिस्चार्ज देण्यात आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

56 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57755(43173+14405+177) आहे. त्यात 1134 मृत झाले आहेत. तर 56565 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 56 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन