रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 555 चाचण्यात एक पॉझिटीव्ह



अकोला,दि.15(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.14) दिवसभरात झालेल्या 555 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात  अकोला येथे पाच चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोट येथे पाच, बाळापूर येथे 44, बार्शीटाकली येथे चार, पातूर येथे 15, तेल्हारा येथे चार, मूर्तिजापूर येथे 64, अकोला महानगरपालिका येथे 354, अकोला आयएमए येथे पाच, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 20, वैद्यकीय महाविद्यालय येथे 26, हेगडेवार लॅब येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 555 जणांच्या चाचण्या होऊन त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 95 हजार 943  चाचण्या झाल्या पैकी 14461 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ