पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते विकास कामांचे भुमिपूजन, लोकार्पण

 




अकोला, दि. २९ (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते अकोट तालुक्यात ग्रामपंचायत इमारतीचे भुमिपूजन, ग्रामपंचायत व व्यायामशाळा इमारतींचे लोकार्पण करण्यात आले.

अकोट तालुक्यातील ग्रा.पं. तरोडा येथे ग्रामपंचायत सभागृह भुमिपूजन ना. कडू यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर लोतखेड येथे ग्रामपंचायत भवन इमारत व  व्यायामशाळा लोकार्पण  हे कार्यक्रमही ना. कडू यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी लोतखेड येथे दिव्यांग व्यक्तिंचे अनुदानाचे धनादेश तसेच शिधापत्रिकांचे वाटप ही  पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ