बालकांची काळजी संरक्षण कृती दल; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा



अकोला, दि. २७ (जिमाका)- कोवीड -१९ महामारीमुळे पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे पालनपोषण, यथायोग्य संरक्षण व संगोपनाकरीता कृती दलाचे गठन जिल्हास्तरावर करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय कृती दलाचा आढावा आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी घेतला

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत हा आढावा घेण्यात आला. यावेळी महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. पल्लवी कुळकर्णी,  मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. सुनिल मानकर,  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिती ताटे, डॉ. वंदना पटोकार, सुनिल सरकटे आदी उपस्थित होते.

कोरोनाचा विषाणूमुळे बऱ्याच बालकांनी पालक गमावले आहेत. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालकांचे शोषण तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता असते. या बालकांचे शोषण होवू नये व त्यांचे संरक्षण व पालनपोषण करण्याकरीता जिल्हास्तरीय कृती दल गठीत करण्यात आले आहे. या कृती दलामार्फत पालक गमावलेल्या बालकांचे पालनपोषण व संरक्षण करण्यात येते. सध्या जिल्ह्यात ५० वर्षाच्या वयोगटातील पालकांच्या सर्व्हेक्षणाव्दारे एकल पालक असलेल्या १२३ बालकांची माहिती बाल कल्याण समितीकडे देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

कोविड महामारीमुळे पालक गमावलेल्या बालकांचा बाल संगोपन योजनेत समावेश करुन त्यांचे पालन पोषण व सरंक्षण करा. तसेच दोनपेक्षा जास्त  मुले असणाऱ्या कुटूंबाचे प्रस्ताव तयार करुन ते ही शासनाकडे मार्गदर्शनाकरीता पाठविण्याचे, निर्देश जिल्हाधिकारी  निमा अरोरा यांनी दिले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ