मुकबधिर मुलांना विनामुल्य प्रवेश सुरु

 


अकोला,दि.20 (जिमाका)- शासकीय मुकबधिर विद्यालय येथे सन 2021-22 शैक्षणिक सत्राकरीता मुकबधिर विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते सातवी करीता मुलांना प्रवेश देणे सुरु आहे. प्रवेशाकरीता विद्यार्थी कर्णबधिर असावा, जिल्हा शल्य चिकित्सकाचे अपंगत्वाचे 40 टक्के वरील प्रमाणपत्र असावे, वयोगट सहा ते 16 वर्षापर्यत, एकापेक्षा जास्त अपंगत्व नसावे, विद्यार्थी हा महराष्ट्राचा रहिवासी असावा.

विद्यार्थ्यांना संस्थेत विनामुल्य प्रवेश दिल्या जाईल. विद्यार्थ्यांनाकरीता निवासाची, भोजनाची, अंथरुन-पांघरुन, शालेय स्टेशनरी व शासनाच्या निर्देशाप्रमाणे विनामुल्य सुविधा पुरविल्या जाईल. प्रवेश अर्ज शासकिय मुकबधिर विद्यालय येथे विनामुल्य उपलब्ध आहे. अधिक माहितीकरीता समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद (अपंग शाखा) व शासकीय मुकबधिर विद्यालय, महसुल कॉलनी, मलकापूर येथे संपर्क साधावा, असे शासकीय मुकबधिर विद्यालयाचे अधिक्षक यांनी कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ