रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 915 चाचण्यात चार पॉझिटीव्ह
अकोला,दि.7(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी
जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.6) दिवसभरात 915 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात
आली.
काल
दिवसभरात अकोट येथे 42 चाचण्या
झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथील पाच चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 80 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोला येथे 15,
बाळापूर येथे 32, बार्शीटाकळी येथे 12, पातूर येथे 37, अकोला मनपा येथे 603, अकोला आयएमए येथे सहा, वैद्यकीय महाविद्यालय येथे 31, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 32, हेगडेवार
लॅब येथे 20 चाचण्या
झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 915 जणांच्या चाचण्या होऊन त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 90 हजार
921 चाचण्या झाल्या पैकी 14433 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा