तिसऱ्या लाटेतही उद्योगाची चाके फिरती ठेवण्याचे नियोजन; जिल्हाधिकारी अरोरा यांची अकोला इंड.असो.च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

 




अकोला,दि.१५(जिमाका)- कोविड च्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योगाची चाके कशी फिरती ठेवता येतील याबाबतचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज अकोला एम आय डी सी येथील उद्योजकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

या संदर्भात उद्योजकांची मते विचारात घेण्याविषयी शासनाने निर्देश दिले आहेत. त्यादृष्टीने आज  ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.यावेळी  जिल्हा उद्योग केंद्राचे महा व्यवस्थापक  निलेश निकम, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए. बी. डाबेराव, अकोला इंडस्ट्रियल असोसिएशनचे  निखिल अग्रवाल,नितीन बियाणी. मालू तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

यावेळी किती उद्योग हे वर्क फ्रॉम होम या पद्धतीने चालविता येऊ शकतात? किती उयोगांमध्ये कामगारांना राहण्या व भोजनाची व्यवस्था होऊ शकते, वाहतुक व्यवस्था, उद्योगांमधील उत्पादित मालाची आवश्यकता या दृष्टीने माहिती घेण्यात आली. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे लसीकरणासाठी व्यवस्था करणे, तसेच कोविड सेंटर उभारणीचे नियोजन करणे या मुद्यांवरही चर्चा करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ