बकरी ईद साधेपणाने साजरी करा-जिल्हाधिकारी पापळकर

 अकोला,दि.१३(जिमाका)-  बकरी ईद हा सण दि.२१ रोजी (चंद्र दर्शनावर अवलंबून) आहे. कोविड १९ च्या संसर्गाच्या पार्श्वभुमिवर सध्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. या संदर्भात गृह विभागाने एका परिपत्रका द्वारे मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, या काळात  बकरी ईदची नमाज ही घरुनच अदा करावी. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी, अशा शासनाच्या गृहविभागाने जारी केलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ