कोषागार कार्यालयाने मागविला आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचा तपशिल

 अकोला,दि.८(जिमाका)- भारतीय स्टेट बॅंकेने नवीन सीएमपी प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीनुसार प्रत्येक आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना लॉग इन करण्यासाठी  त्यांचा सेवार्थ आयडी हा युजर नेम म्हणून वापरावयाचा आहे. त्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांचा सेवार्थ आयडी चा अचूक तपशिल भारतीय स्टेट बॅंकेस द्यावयाचा आहे. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांचे कार्यालय व  आहरण संवितरण अधिकाऱ्यांबाबतचा तपशिल आपापल्या संबंधित कोषागार वा तालुका कोषागार कार्यालयास बुधवार दि.१४ पर्यंत सादर करावा, असे जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगावकर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन