४३८ अहवाल प्राप्त, ‘शून्य’ पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज

  अकोला,दि.१७(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ४३८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४३८  अहवाल निगेटीव्ह तर ‘शून्य’ अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.१६) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्येही एकही  अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57717(43139+14401+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर शून्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य = एकूण पॉझिटीव्ह शून्य.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३००९१६ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३०३६५५ फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१३६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३००८५६ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २५७४१७ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

‘शून्य’ पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

दोन जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर आयकॉन हॉस्पिटल व बिहाडे हॉस्पिटल येथील प्रत्येकी एक,  असे एकूण दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

४५ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57717(43139+14401+177) आहे. त्यात ११३३ मृत झाले आहेत. तर ५६५३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४५ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन