५७५अहवाल प्राप्त, दोन पॉझिटीव्ह, आठ डिस्चार्ज

अकोला,दि.१५ (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ५७५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५७३ अहवाल निगेटीव्ह तर दोन अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


त्याच प्रमाणे काल (दि.१५) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एका जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57711(43133+14401+177)झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर दोन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह तीन.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २९९९२३ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे २९६३९६ फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१३० नमुने होते. आजपर्यंत एकूण २९९८८० अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २५६७४७ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दोन पॉझिटीव्ह

आज दिवसभरात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुषाचा समावेश असून ते अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
आठ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर उपजिल्हा रुग्णालयात मूर्तिजापूर येथील दोन व होम आयसोलेशनतील सहा, असे एकूण आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
48 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57711(43133+14401+177) आहे. त्यात 1132 मृत झाले आहेत. तर 56531 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 48 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा