125 अहवाल प्राप्त, दोन पॉझिटीव्ह


          अकोला,दि.26(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 125 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 123 अहवाल निगेटीव्ह तर दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57750(43169+14404+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह दोन.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 302923 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 299381 फेरतपासणीचे 397 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3145 नमुने होते. आजपर्यंत एकूण 302877 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 259708 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दोन पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुषांचा समावेश असून ते अकोला मनपा क्षेत्रातील आहे. दरम्यान काल (दि.25) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांत शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

61 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57750(43169+14404+177) आहे. त्यात  1133 मृत झाले आहेत. तर 56556 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 61 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

            ००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ