डाक जीवन विमा थेट अभिकर्ता नेमणूक;अर्ज करण्याचे आवाहन

 अकोला,दि.१२(जिमाका)-  भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेअंतर्गत जिल्ह्याअंतर्गत  थेट अभिकर्त्यांची नेमणूक करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाचा नमुना अकोला प्रधान डाकघर किंवा प्रवर डाक अधीक्षक अकोला यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत असे प्रवर डाक अधीक्षक, अकोला विभाग, अकोला यांनी कळविले आहे.

निकषः

१)     उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी व ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

२)     इयत्ता दहावी किंवा मान्यता प्राप्त बोर्डाची समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावे.

३)      बेरोजगार, स्वयंरोजगार करणारे व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार,  कोणत्याही विमा कंपनीचे अभिकर्ता, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी इ. कुणीही अर्ज करु शकतात.

४)    उमेदवाराची निवड थेट  मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य,  व्यक्तिमत्व, परस्पर संवाद कौशल्य,  जीवन विमा बाबत ज्ञान याआधारावर केली जाईल.

५)    निवड झालेल्या उमेदवारांकडून पाच हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून  राष्ट्रीय बचत प्रमाण पत्र वा किसान विकास पत्र या स्वरुपात असेल.

६)      प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपाचा परवाना  देण्यात येईल. नंतर आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर तो कायम स्वरुपी केला जाईल.

७)    निवड झालेल्या उमेदवारास  डाक विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन देण्यात येईल.

तरी इच्छुक उमेदवारांनी  प्रवर डाक अधीक्षक, अकोला विभाग, सिविल लाईन येथे विहित नमुन्यातील अर्ज, सर्व शैक्षणिक कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड व अन्य संबंधित कागदपत्रांसह दि.२६ व २७ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी दोन वाजे दरम्यान उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना