नॅशनल वोटर सर्विस पोर्टलवर मतदार नोंदणी केलेल्या अर्जदारांनी इ-इपिक डाऊनलोड करा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 अकोला, दि.१२(जिमाका)- अकोला जिल्‍ह्यातील ४६२४ नागरिकांचे नॅशनल वोटर सर्विस पोर्टल वर मतदार नोंदणी अर्ज ग्राह्य धरले गेले असुन त्‍यापैकी ३८५४ मतदारांनी अद्याप आपले इ-इपिक डाऊनलोड केले नाहीत. अशा सर्व मतदारांनी आपापले इ-इपिक डाऊनलोड  करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

याबाबत निवडणूक शाखेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्‍ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात दि.१ जानेवारी २०२१ पासुन मतदार यादीत नव्‍याने नाव समाविष्‍ट करण्‍यासाठी प्राप्‍त झालेल्‍या अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाल्‍याचे संदेश मोबाईलवर प्राप्‍त झाले असल्‍यास त्या त्या मतदारांना निवडणूक आयोगाच्‍या संकेतस्‍थळावरुन -पिक घरच्‍या घरीच डाऊनलोड करणे शक्‍य आहे. या प्रक्रियेमध्‍ये कोणत्‍याही प्रकारची अडचण येत असल्‍यास मतदारांनी आपल्या तालुक्‍यातील तहसिल कार्यालयतील निवडणूक शाखेमध्‍ये संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी जितेंद्र पापळकर  यांनी केले आहे.

संकेतस्‍थळावरुन -पिक डाऊनलोड असे करावे....

·         https://www.nvsp.in या संकेतस्‍थळावर जावे.

·         आपले नाव,मोबाईल क्रमांक, द्वारे संकेतस्‍थळावर लॉगीन करावे.

·         आपल्‍याला प्राप्‍त ईपीक क्रमांक किंवा नमुना सहा अर्जावरिल रेफरन्‍स क्रमांक नमुद करावा.

·         आपल्‍या नोंदणी केलेल्‍या मोबाईल क्रमांकावर आलेल्‍या OTP द्वारे Verify करावे.

·         Download Epic वर Click  करावे व -इपिक प्राप्‍त करावे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ