रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 700 चाचण्यात दोन पॉझिटीव्ह



अकोला,दि.9(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.8) दिवसभरात झालेल्या 700 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात वैद्यकीय महाविद्यालय येथे 34 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोला येथे 22, अकोट येथे 12, बाळापूर येथे 29, बार्शीटाकली येथे दोन, तेल्हारा येथे पाच, मुर्तिजापूर येथे 85, अकोला महानगरपालिका येथे 465, अकोला आयएमए येथे चार, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 26, हेगडेवार लॅब येथे 16 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 700 जणांच्या चाचण्या होऊन त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 92 हजार 338 चाचण्या झाल्या पैकी 14437 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना