'उमेद'ची जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शनीय परसबाग: परसबागेतील भाजीपाला उत्तम आरोग्यदायक आहार- सौरभ कटीयार

 






अकोला, दि.१३(जिमाका)- ‘उमेद’ अभियानअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात परसबाग लावण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या परसबागेत पिकवलेला सेंद्रीय व आहारमूल्य असलेला भाजीपाला हा संपुर्ण कुटूंबासाठी उत्तम आरोग्यदायक आहार असून परसबाग तयार करण्याच्या उपक्रमाला अधिकाधिक चालना दिली जावी,असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी व्यक्त केले.

‘उमेद’ अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे निर्मित जिल्हास्तरीय पोषण परसबागेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अती. मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अकोला गजानन महल्ले, उमेद अभियानाचे सर्व जिल्हा व्यवस्थापक व तालुका अभियान व्यवस्थापक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुरज गोहाड,  कृषी विज्ञान केंद्राच्या शास्स्त्रज्ञ  श्रीमती ‍कीर्ती देशमुख उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत जिल्ह्यात १५ जून ते १५ जुलै २०२१ या कालावधीत माझी पोषण परसबाग विकसन मोहीम राबविण्यात येत आहे.

या वेळी मार्गदर्शन करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी कटियार यांनी परसबागेचे महत्व समजून सांगतले.परसबागेमधून मानवी शरीराची वाढ व विकास, शरीरवर्धक, ऊर्जावर्धक व आरोग्य संरक्षण, देणाऱ्या अन्न पदार्थांची गरज भागविली जाते. जिल्ह्यात कोरोनाच्या काळातही ग्रामीण महिलांनी ४१०० परस बागेची निर्मिती केलेल्या आहेत. उमेद अभियान अंतर्गत अकोला जिल्ह्यात २०१८  पासून आतापर्यंत आहार पोषण व स्वच्छता विषयक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः गरोदर माता स्तनदा माता ६ ते २४  महिने वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्या आहारामध्ये नियमित स्वच्छ व जैविक पद्धतीने पिकवलेल्या ताजा भाजीपाला व फळे इत्यादीचा समावेश व्हावा याकरिता उमेद अभियान प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील महिलांनी अशा पद्धतीची परसबाग तयार करावी असे आवाहनही त्यांनी  केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ