जागतिक युवा कौशल्य दिन: आरोग्य क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षणासाठी युवक युवतींनी पुढे यावे- सौरभ कटीयार

 



अकोला,दि.१५(जिमाका)- आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी आहेत. त्यामुळे या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मागणी कायम राहणार आहे. त्यासाठी आरोग्य क्षेत्रातील विविध कौशल्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी युवक युवतींनी पुढे यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी केले.

            जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त येथील ओझोन हॉस्पिटल मध्ये मुख्यमंत्री महाआरोग्य अभियाना अंतर्गत सुरु असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थ्यांशी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी संवाद साधला.

या ठिकाणी जनरल ड्युटी असिस्टंट या पदासाठी २० जणांचे प्रशिक्षण सुरु असून या प्रशिक्षणार्थ्यांना इंडक्शन किट्स वितरीत करण्यात आले. यावेळी  सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र द. ल. ठाकरे, एकात्मिक  आदीवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी राजकुमार हिवाळे,  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य महेश बंडगर,  उपप्राचार्य शरदचंद्र ठोकरे,  ओझोन  हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीन बोराखडे आदी उपस्थित होते. यशस्वी आयोजनासाठी निशिकांत पोफळी, अजय चव्हाण, सुनिता गोळे, राजू ओळंबे. मुक्ता खोटरे यांनी परीश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ