सज्जता तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्याची; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी ऑक्सिजन प्लांट ३१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

 




अकोला,दि. 21(जिमाका)- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयात भेट देऊन पाहणी केली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पूर्व तयारीचा भाग म्हणून त्यांनी ही पाहणी केली. तसेच ऑक्सिजन उपलब्धता व पुरवठा याबाबतही आढावा घेतला.

 

यावेळी त्यांचे समवेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. आडे, अन्न औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक मेटकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अरोरा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात उभारणी होत असलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या कामाची पाहणी केली. तसेच पीपीई किट परिधान करून कोविड कक्षात ही भेट दिली. जुलै महिना अखेर पर्यंत ऑक्सिजन प्लांट पूर्ण करण्यात यावा,असे निर्देश दिले.  यावेळी त्यांनी सुरश्री उद्योग व माऊली उद्योग या ऑक्सिजन प्लांटलाही भेट दिली. जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने  खाजगी रुग्णालयात ही ऑक्सिजनची पूर्ण क्षमतेने उपलब्धता राहील, याबाबत दक्षता बाळगण्याचे निर्देश त्यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ