रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 670 चाचण्यात सहा पॉझिटीव्ह



अकोला,दि.14(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.13) दिवसभरात झालेल्या 670 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात  अकोला महानगरपालिका येथे 455 चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे पाच चाचण्या झाल्या त्यात दोघांचा  अहवाल पॉझिटीव्ह आला, वैद्यकीय महाविद्यालय येथे 32 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोला येथे एक, अकोट येथे 26, बाळापूर येथे नऊ, बार्शीटाकली येथे एक, पातूर येथे 14, तेल्हारा येथे पाच, मूर्तिजापूर येथे 71, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 38, हेगडेवार लॅब येथे 13 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 670 जणांच्या चाचण्या होऊन त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 95 हजार 388 चाचण्या झाल्या पैकी 14460 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ