खराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन

 


अकोला,दि.31(जिमाका)-जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते खराब झाल्याच्या तक्रारी आहेत.  त्यातही ज्या गावांना  इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते यांना जोडणारे रस्ते खराब आहेत व ज्यामुळे गावांशी संपर्क, दळण वळणास अडचणी येत आहेत, अशा रस्त्यांची माहिती ग्रामपंचायतींनी पालकमंत्री कार्यालयास कळवावी,असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.

त्यासाठी खराब रस्त्याच्या छायाचित्र शक्य झाल्यास व्हिडीओ व एक पत्र पालकमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,अकोला येथे पाठवावे,असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात लवकरच  बैठक आयोजित करण्यात येणार असून त्याबैठकीत निर्णय घेऊन रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेणे शक्य होईल,असेही ना.कडू यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ