सार्वजनिक वितरण व्यवस्था: ऑगस्ट महिन्यासाठी वाटप परिमाणे निश्चित

 


            अकोला,दि.20 (जिमाका)- जिल्ह्याकरिता  माहे ऑगस्ट-2021 करिता लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक  वितरण  व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य/नियंत्रित  साखर  इत्यादी  जीवनावश्यक  वस्तुचे  वाटप  परिमाणे खालील प्रमाणे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे यांनी दिली आहे.

.क्र.

धान्याचा प्रकार

वाटप परिमाण

धान्य वाटपाचे 

किरकोळ दर

1

प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी गहु

 तीन किलो प्रति व्यक्ती

प्रति किलो  दोन रुपये

2

प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी तांदुळ

दोन किलो प्रति व्यक्ती

प्रति किलो  तीन रुपये

3

अंत्योदय अन्न योजना गहू

15 किलो प्रति कार्ड

 प्रति किलो दोन रुपये

4

अंत्योदय अन्न योजना तांदुळ

20 किलो प्रति कार्ड

प्रति किलो  तीन रुपये

5

एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता गहु

चार किलो प्रति व्यक्ती

प्रति किलो  दोन रुपये

6

एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता  तांदुळ

एक  किलो प्रति व्यक्ती

प्रति किलो  तीन रुपये

7

नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्याकरिता

एक किलो प्रति शिधापत्रिका

 (साठा उपलब्धतेनुसार )

प्रति किलो  20 रुपये

8

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यासाठी गहु व तांदुळ

प्रति सदस्य प्रतिमाह तीन किलो गहु व दोन किलो तांदुळ

मोफत

9

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योद्य अन्न योजना गहु व तांदुळ

प्रति सदस्य प्रतिमाह तीन किलो गहु व दोन किलो तांदुळ

मोफत

त्यानुसार वाटप परिमाण खालीप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे. वरील वाटप परिमाण गोदामातील साठ्याचे  लाभार्थी संख्याचे उपलब्धतेनुसार राहील,असेही जिल्हा पुरवठा विभागाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ