रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 784 चाचण्यात सात पॉझिटीव्ह
अकोला,दि.10(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.9) दिवसभरात झालेल्या 784 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात बाळापूर येथे 20 चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मूर्तिजापूर येथे 89 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोला येथे पाच, अकोट येथे 12, बार्शीटाकली येथे एक, पातूर येथे 27, तेल्हारा येथे आठ,अकोला महानगरपालिका येथे 545, अकोला आयएमए येथे सहा, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 23, वैद्यकीय महाविद्यालय येथे 40, हेगडेवार लॅब येथे आठ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 784 जणांच्या चाचण्या होऊन त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 93 हजार 122 चाचण्या झाल्या पैकी 14446 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा