जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाला प्रारंभ - डॉ. दिलीप रणमले
जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाला प्रारंभ - डॉ. दिलीप रणमले अकोला, दि. 31 : जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली असून, दि. 13 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे आरोग्य सहायक संचालक (कुष्ठरोग निर्मूलन) डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले. कुष्ठरूग्णांकडे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही. नियमित उपचार घेणा-या रुग्णांपासून इतरांना मुळीच अपाय नाही हे माहित असूनही सुशिक्षीत व्यक्तीही त्यांना टाळतात. ही हीनतेची भावना नष्ट व्हावी आणि हा रोग औषधोपचाराने विकृती न येता पूर्णपणे बरा होतो हा संदेश जनमानसावर ठसवण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे. अभियानात घरोघरी सर्वेक्षण करुन नविन कुष्ठरूग्णांचा शोध घेतला जाईल, जुन्या रूग्णांना भेटून नियमित उपचार घेतल्याची खातरजमा करणे, विकृती प्रतिबंधक सल्ला व सेवा देणे आदी कामे केली जातील. त्याचप्रमाणे, कुष्ठरूग्णांना शासनाच्या एस.टी. व रेल्वे मोफत प्रवास योजना, संजय गांधी निरा...