ग्रा.पं. निवडणूकःप्रशासन सज्ज






 अकोला दि.१४(जिमाका)-   जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी प्रशासनाची सर्व सज्जता झाली आहे. आज निवडणूकीशी संबंधित सर्व विभागांचा आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, तहसिलदार सुनिल पाटील, सहा. पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, तसेच तालुकास्तरीय सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, तसेच सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश देण्यात आले. शिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हिल चेअर आदी सुविधा उपलब्ध करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडावी,असे निर्देश यावेळी देण्यात आले.

निवडणूक शाखेमार्फत बैठकीत देण्यात आलेली माहिती याप्रमाणे-

निवडणूक व्हावयाच्या ग्रामपंचायती(निवडणूक कार्यक्रम जाहीर होतेवेळी)

जिल्ह्यात  तेल्हारा तालुक्यात ६२ पैकी २३, अकोट-८४ पैकी ३७, मुर्तिजापूर-८६ पैकी ५१, अकोला- ९७ पैकी ५४, बाळापूर ६६ पैकी २६, बार्शी टाकळी- ८० पैकी ४७, पातूर- ५७ पैकी २८ अशा एकूण ५३२ पैकी २६६ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात सात सदस्यीय ग्रामपंचायती १९८, ९ सद्स्यीय ५५, ११ सदस्यीय ८,  १३ सदस्यीय ३ तर 15 व 17 सदस्यीय प्रत्येकी एका ग्रामपंचायतींचा समावेश आहे. प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झाली त्यावेळी  एकूण ८१७ प्रभागांमध्ये ही निवडणूक व्हावयाची होती व त्यात २०७४ सदस्यांची निवड करावयाची होती.

उमेदवारी अर्ज छाननी व माघारीनंतरची स्थिती

उमेदवारी अर्जांची छाननी व उमेदवारी माघारीनंतर जिल्ह्यात आता तेल्हारा तालुक्यात २३, अकोट- ३६, मुर्तिजापूर-५१, अकोला-५४, बाळापूर २६, बार्शीटाकळी-४७ तर पातूर-२८ अशा एकूण २६५ ग्रामपंचायतींमध्ये आता निवडणूक होणार आहे. यात निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या ६७९ असून त्यातून १४७४ सद्स्यांची निवड व्हावयाची आहे. एकूण ५७१ सदस्य हे अविरोध ठरले आहेत, २९ ठिकाणी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यात एकूण अविरोध प्रभागांची संख्या १३८ आहे. सरपंच वगळता ५ ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य अविरोध झाले आहेत. त्यात तेल्हारा-१, अकोट-१, अकोला-३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सरपंचपदासाठी २५८ ठिकाणी निवडणूक

 सरपंचपदासाठी २५८ जागांवर निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार अविरोध ठरले असून चार ठिकाणी सरपंचपदाकरीता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झालेला नाही.  एकंदर सरपंच व सदस्य असे मिळून १६९५ जण उमेदवारीच्या रिंगणात आहेत.

अविरोध सरपंच ठरलेल्या ग्रा.पं.- हिंगणी खु. ता. तेल्हारा, धामणगाव व अकोली जहांगिर ता. अकोट, उमरी ता. मुर्तिजापूर.

सरपंचपदासाठी एकही अर्ज प्राप्त न झालेल्या ग्रा.पं.-बांबर्डा ता. अकोट,भौरद ता. अकोला, परंडा ता. बार्शीटाकळी, गोधंडवाडी ता. पातूर.

 धामणगाव ता. अकोट ही एकमेव ग्रामपंचायत संपूर्ण अविरोध(सरपंच व सदस्य) झाली आहे.

३ लाख ८ हजार ३१७ मतदार बजावणार हक्क

 यानिवडणूकीत एकूण ३ लाख ८ हजार ३१७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात १ लाख ६१ हजार ६५९  पुरुष तर १ लाख ४६ हजार ६५४ महिला व ४ इतर मतदारांचा समावेश आहे.

तालुकानिहाय मतदार संख्या या प्रमाणे-  तेल्हारा- ३११३४, अकोट- ५२०७९, मुर्तिजापूर-५८६८४, अकोला- ५६९२४, बाळापूर-२७१८५, बार्शीटाकळी-४८३३२, पातूर-३३९६२. जिल्ह्यात एकूण २५९९ दिव्यांग मतदार आहेत.

निवडणूक यंत्रणा- यानिवडणूकीसाठी एकूण मतदान केंद्र ८३२ असून त्यातील संवेदनशील मतदान केंद्र १७९ आहेत. (संवेदनशील मतदान केंद्र तालुकानिहाय- तेल्हारा-७, अकोट-४२, मुर्तिजापूर-५१, अकोला-९, बाळापूर-१२, बार्शीटाकळी-३३, पातूर-२५.) निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी ३८७६ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.  तर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४२९३ मनुष्यबळ संख्या उपलब्ध करण्यात आली आहे.

मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेली तालुकानिहाय ठिकाणे याप्रमाणे-

तेल्हारा- नवीन तहसिल कार्यालय, गाडेगाव रोड, तेल्हारा., अकोट- नवीन तहसिल इमारत, पोपटखेड रोड, अकोट., मुर्तिजापूर- नवीन शासकीय धान्य गोदाम, मुर्तिजापूर., अकोला- शासकीय धान्य गोदाम, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला., बाळापूर- शासकीय धान्य गोदाम, बाळापूर., बार्शीटाकळी- पंचायत समिती सभागृह, बार्शी टाकळी., पातूर- तहसिल कार्यालय, पातूर.

यानिवडणूकीसाठी रविवार दि.१८ रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० (अखंड).

मतमोजणी मंगळवार दि.२० रोजी होणार आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ