बालगृहात ‘वीर बाल दिवस’ साजरा



अकोला,दि. 27(जिमाका)- गुरु गोविंदसिंह यांचे लहान सुपूत्र साहीब जादे जोरावर सिंहजी, साहिबजादे फतेहसिंहजी यांच्या शहादत दिवसानिमित्त सोमवार दि. 26 रोजी शासकीय बालगृहात ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्यात आला.

गुरु गोविंदसिंह यांचे लहान सुपूत्र साहीब जादे जोरावर सिंहजी, साहिबजादे फतेहसिंहजी यांच्या शहादत दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणुन दि. २६ डिसेंबर हा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस वीर बालदिवस म्हणुन साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीष पुसदकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालगृहे शासकीय निरीक्षणगृह व बालगृह, गायत्री बालिकाश्रम सुर्योदय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह या बालगृहांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बालकांना वीर बालदिवस साजरा करण्यामागचे पाश्वभूमी सांगून गुरु गोविंद सिंह व त्यांचे चार साहीब जादे यांच्या बलिदानाविषयी माहिती दिली. तसेच लहान सुपूत्र साहीब जादे जोरावर सिंह, साहिबजादे फतेहसिजी यांच्या बलिदानाविषयी गौरवकथा सांगण्यात आली. तसेच मुलामुलींना गोष्टीची पुस्तीका भेट देण्यात आली. कार्यक्रमाकरिता बाल कल्याण समिती सदस्य राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, सुनिल लाडुलकर, नितीन अहिर, सचिन घाटे, रेवत खाडे, शासकीय निरीक्षणगृहाचे जयश्री वाढे, सुर्योदय बालगृहाचे प्रकल्प समन्वयक शिवराज खंडाळकर, गायत्री बालिकाश्रमच्या संचालिका मिरा जोशी, वैशाली भटकर अधिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ