कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘एक’ पॉझिटिव्ह; एक डिस्चार्ज
अकोला दि.22(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून
कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 61 अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत
कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण
पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 1 व खाजगी 0)1+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण
पॉझिटीव्ह 1.
आरटीपीसीआर ‘एक’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात एकाचा अहवाल
पॉझिटिव्ह आला. त्यात एका महिलेचा समावेश असून हा रुग्ण अकोला महानगरपालिका
क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
एक डिस्चार्ज
आज दिवसभरात एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय रुग्ण ‘आठ’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 66084(49951+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात आठ
सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात
आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा