284 शाळेमधून 3902 विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा


अकोला दि.19(जिमाका)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती परीक्षा बुधवार दि. 21 डिसेंबर रोजी होणार आहे. या परिक्षेत जिल्ह्यातील 284 शाळेतील 3902 विद्यार्थीं परिक्षेत सहभागी होणार असून जिल्ह्यातील 16 केंद्रावर परिक्षेचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक सुचिता पाटेकर यांनी दिली आहे.

            राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मार्फत इयत्ता आठवीत प्रवेशीत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे याकरीता 2007-08 पासून शिष्यवृत्ती परिक्षा सुरु केली आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षणाकरीता आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये शिष्यवृत्ती पात्र ठरलेला विद्यार्थ्यांस दरमहा 12 हजार वार्षिक प्रमाणे इयत्ता बारावी पर्यंत म्हणजेच 48 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. या परीक्षेसाठी दोन विषय आहे. पहिला विषय बौद्धिक क्षमता चाचणी- यामध्ये मानसशास्त्रीय चाचणी असून कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पना आधारित 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असेल. तर दुसरा विषय शालेय क्षमता चाचणी- यामध्ये सामान्यता इयत्ता सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल त्यामध्ये सामान्य विज्ञान 35 गुण,  समाजशास्त्र 35 गुण, गणित 20 गुण असे तीन विषयांचे एकूण 90 प्रश्न राहिल.

प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलगू या आठ माध्यमातून उपलब्ध असतील. सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यम बरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकासाठी स्वतंत्र उत्तर पत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे किंवा काळे पूर्णता रंगवून उत्तर नोंदवायचे आहे.  पेन्सिलचा वापर केलेली, अपुरी अंशता रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाही.  एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली उत्तरे, चुकीच्या पद्धतीने नोंदविलेली उत्तरे, व्हाइटनर, काळाखोड करून नोंदलेली किंवा गिरवली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाही. अखिल भारतीय पातळीवर शिष्यवृत्तीची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी 11 हजार 682 कोटा निश्चित करून दिलेला आहे. कोट्यानुसार व राज्यांच्या सर्वांगनिहाय आरक्षणा नुसार गुणवत्ताच्या आधारे जिल्हा न्याय संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.  दिव्यांगासाठी प्रत्येक संवर्गात दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण दिल्या जाते.

शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र

 1. भारत विद्यालय अकोला, 2. श्रीमती मनीषा अभ्यंकर,जागृती विद्यालय, अकोला 3. उस्मान आझाद उर्दू हायस्कूल,अकोला 4. मांगीलाल शर्मा विद्यालय,अकोला  5. स्वावलंबी विद्यालय, अकोला 6. श्री शिवाजी विद्यालय अकोट, 7.  श्री सरस्वती विद्यालय अकोट 8. श्री नरसिंग विद्यालय, अकोट  9. श्रीमती धनाबाई विद्यालय, बाळापुर 10. बाबासाहेब धाबेकर विद्यालय, बार्शीटाकळी 11.मूर्तिजापूर हायस्कूल मुर्तीजापुर 12. भारतीय ज्ञानपीठ विद्यालय, मुर्तीजापुर 13.पंचशील विद्यालय, कुरुम 14.  शहा बाबू उर्दू हायस्कूल, पातुर 15. सेढ बन्सीधर विद्यालय, तेल्हारा 16. सहदेवराव भोपळे विद्यालय हिवरखेड.

जिल्ह्यातील 284 शाळेमधून 3902 विद्यार्थी 16 केंद्रावर बुधवार दि. 21 डिसेंबरला ही परीक्षा देणार आहेत.   परीक्षेकरिता विद्यार्थ्यांनी केंद्रावर अर्धा तास अगोदर हजर राहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक सुचिता पाटेकर यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ